नेवासा-बेलापूर – परळी रेल्वेमार्गाच्या केंद्रीय मंजुरीसाठी कुकाणा येथे सुरू असलेले उपोषण शनिवारी सहाव्या दिवशीही सुरूच असून, रेल्वे प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप विविध संघटनेतून केला जात आहे.
कोणत्याही क्षणी हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली असून, रास्तारोको, बंद आणि विविध लोकशाही मार्गाने आंदोलने करण्याची हालचाल सुरू झालेली आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपोषणकर्त्याना
शारीरिक थकवा जाणवू लागलेला असून, आंदोलकांना आता भुरळ येत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.
कुकाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डिंबर यांनी उपोषणकर्त्यांची तपासणी केलेली असून, उपोषणक रितेश भंडारी, सुरेश नरवणे, रज्जाव इनामदार यांची प्रकृती खालवलेल् आहे. नागरिकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केलेली आहे परंतु उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास ठामपणे नकार दिला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

