सोनई प्रतिनिधी.राहुल राजळे…
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनईच्या वतीने यांना शनी दि 14 फेब्रु 2026 रोजी सोनईत कृतज्ञता पुरस्काराने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
तरुणाई समाजासाठी हे ब्रीद घेऊन विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सन्मान करण्यात येतो.
उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आ शंकरराव गडाख यांनी केले.यशवंत प्रतिष्ठान राबवत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
कृतज्ञत भावनेने हा पुरस्कार दिला जातो ही भूमिका विशद केली व उपस्थितांचे आभार मानले.
डॉ राजेंद्र धामणे म्हणाले
निरपेक्षपणे सामाजिक जाणिव ठेवत काम केल्याने मानसिक समाधान लाभते मनगावच्या माध्यमातून
मन व गाव हरवलेल्या लोकांची आपले कुटूंब सदस्य म्हणून
म्हणून काम करता येते
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान पुढाकार घेऊन सामाजिक काम करते हे दिशादर्शक आहे
नेवासा तालुक्यात प्रतिष्ठानच्या
उपक्रमात सदोदित सहभागी राहू असे डॉ धामणे म्हणाले
याप्रसंगी डॉ सुचेता धामणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना एबीपी माझाचे युनिट हेड राजीव खांडेकर म्हणाले ग्रामविकासासाठी ग्रामीण भागात राहून दत्तकग्राम,मरणोत्तर नेत्रदान,गाव तिथे वाचनालय,मुलींचे दत्तक पालकत्व यांसारखे सामाजउपयोगी उपक्रम राबवून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने एक दिशादर्शक काम मा खा यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने आ शंकरराव गडाख व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे व
उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली ते अखंड सुरू आहे.
यशवंत प्रतिष्ठान सारख्या सामाजिक संस्थामुळे गावांचा कायापालट होतो आहे.भविष्यात गावे हीच विकासाची केंद्रे निर्माण होणार आहेत कृतज्ञता पुरस्काराने रचनात्मक काम करण्याची प्रेरणा मिळाली असे राजीव खांडेकर म्हणाले.

माजी मंत्री शंकरराव गडाख हे
जनसेवाचा वसा व वारसा
घेऊन काम करणारे नेतृत्व असल्याचे राजीव खांडेकर म्हणाले
सोनई गावात सोन्यासारख्या
भेटून आनंद वाटला.
प्रा डॉ रंगनाथ पठारे म्हणाले हा पुरस्कार माझ्या घरचा पुरस्कार आहे.
आज पर्यत झालेल्या सन्मानापैकी
आजचा पुरस्कार
सर्वोच्च असल्याचे ते म्हणाले.
सहकारातुन समाजकारणाची
वाटचाल कौतूकास्पद आहे
कृतज्ञता पुरस्कार
हा त्यागाचा सन्मान आहे.
यशवंतराव गडाख पाटील
यांनी सहकार रुजवला वाढवला
त्यातून परिसराचा विकास झाला
पदमश्री स्व विठ्ठलराव विखे पाटील,स्व भाऊसाहेब थोरात
यांच्या पिढीचा वारसा
यशवंतराव गडाख पाटील हे समर्थपणे चालवतात असे प्रा डॉ रंगनाथ पठारे म्हणाले व सन्मान केल्याबद्दल आभार मानले.
याप्रसंगी बोलतांना आयपीएस अधिकारी महेश भागवत म्हणाले
कृतज्ञता पुरस्काराच्या कार्यक्रमामुळे
ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे
व त्यांच्याकडुन प्रेरणा घ्यावी
असे व्यक्तिमत्व जवळून अनुभवता आले.
आपले दोन्ही हात समाजाच्या
सेवेसाठी
सरसावते ही तरुणाई पाहून मनस्वी आनंद झाला.देशपातळीवर
काम करणाऱ्या
व्यक्तींना दिलेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव करणारा आहे.
याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख,जिल्ह्याचे भूमिपुत्र महेश भागवत आयपीएस तेलंगणा,कल्याणराव तावरे ,विश्वासराव गडाख,उद्योजक विजयराव गडाख,मा सभापती सुनीलराव गडाख,यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख,मा सभापती सौ सुनीताताई गडाख,कु नेहल प्रशांत गडाख,डॉ निवेदिता गडाख,सुरशिंगराव पवार,सुरेश गडाख, संपादक,पत्रकार आदींसह नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातुन मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
कृतज्ञता पुरस्कार देऊन प्रतिष्ठानच्या वतीने
श्रोत्यांच्या ह्रदयाचा ठाव घेणारे
सुत्रसंचालन डॉ सुभाष देवढे पाटील यांनी केले.
पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटोओळी….
सोनई ता नेवासा
राजीव खांडेकर,डॉ रंगनाथ पठारे,, डॉ सुचेता व डॉ राजेंद्र धामणे यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करतांना माजी मंत्री शंकरराव गडाख,उदयन गडाख,उदयन गडाख डॉ सुभाष देवढे आदी..
चौकट..
यशवंत स्टडी क्लब व कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन
प्रशासकीय सेवेत
दाखल झालेले
यामध्ये प्रतीक लांडे,ऋषिकेश तळेकर,शिवम लोखंडे,अमोल भुसाळ,निकिता दराडे( दहिफळे)
यांचा विशेष सन्मान करण्यात आला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

