बिबट्या
बिबट्या

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे मंगळवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास असलेल्या चार चरत कळपावर शेतात शेळ्यांच्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याने एक शेळी ओढून शेजारच्या शेतात नेवून ठार केली. याबाबत माहिती अशी की, पाचेगाव येथील विठ्ठल रंगनाथ मतकर हा तरुण आपल्या शेळ्या ओम सचिन महाले यांच्या मालकीच्या गट नंबर २८८ मध्ये असणाऱ्या मोकळ्या शेतात चारत होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक त्याच्या डोळ्यादेखत शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला व एक शेळीं ओढून शेजारच्या शेतात नेऊन ठार केली.

बिबट्या

विठ्ठल मतकर यांनी दुसऱ्या दिवशी शेळीचा आसपासच्या शेतात शोध घेतला असता ती ठार झालेली शेळी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मिळून आली. त्यात त्याचे सोळा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाचे अधिकारी यांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येऊन सदर मृत शेळीचा पंचनामा केला.

बिबट्या

यावेळी आप्पासाहेब वाकडे, अशोक कर्डिले व विठ्ठल मतकर या तिघांच्या सुमारे शंभर शेळ्या-मेंढ्या चरत होत्या. विशेष म्हणजे शंभर फुटच्या अंतरावर बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. विठ्ठल मतकर यांनी त्या पिंजऱ्यात शेळी देखील ठेवलेली आहे. बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत दिसेल त्या जनावरावर हल्ला करत आहे. यावेळी विक्रांत पवार, नजन, कारभारी माळी, अशोक माळी, बापू माळी, भाऊराव रावसाहेब पवार यांच्या समक्ष वनविभागाचे अधिकारी श्री. धुळे यांनी पंचनामा केला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बिबट्या
बिबट्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बिबट्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!