नेवासा – येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल या विद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नेवासा शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे शिव प्रेमींनी उत्स्फूर्त स्वागत केले. सर्वप्रथम विद्यालयात प्रसिद्ध व्यापारी अतुल सोनार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. “जय भवानी जय शिवाजी “च्या गजराने नेवासा शहर दुमदुमले होते.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी, सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षिका सुनिता दिघे, पर्यवेक्षक अरुण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी वरद दहातोंडे, ओवी कडू, ओवी पवार, रिद्धी पेचे, तन्वी जायगुडे यांनी मनोगत व्यक्त केली.
त्यानंतर प्राचार्य रावसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधीर बोरकर सर यांच्या नेतृत्वाखाली नेवासा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणूकीचे ठिकठिकाणी शिव प्रेमी नागरिक व पालकांनी शिवछत्रपतींचे पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले. नेवासा शहरातील सुप्रसिद्ध खोलेश्वर मंदिर चौकात उद्योजक शिवा पाठक यांच्या हस्ते शिवछत्रपतींचे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी नेवासा शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विद्यालयाच्या वतीने प्रा. रावसाहेब चौधरी यांच्या हस्ते अतुल सोनार, उद्योजक शिवा पाठक व पोलीस प्रशासन यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले. शिक्षक संजय आखाडे यांनी सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








