
सोनई – सोनई येथील स्मार्ट किड्स अकॅडमीमध्ये माजी सभापती सुनीता गडाख यांच्या कर्तृत्वाचा गौरव सोहळा पार पडला. ‘वहिनी कर्तृत्वाचा गौरव’ या विशेष कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.

प्रारंभी अकॅडमीच्या संचालिका डॉ. सोनल लोढा व डायरेक्टर परेश लोढा यांच्या हस्ते सुनीता गडाखांचे स्वागत करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून स्मार्ट किड्स अकॅडमी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची परंपरा जपत आहे. यावर्षी अकॅडमीचे दहावे वर्ष पूर्ण होत असल्याने या विशेष वर्षात सात कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सेवाप्रीत विमन (एनजीओ), मीनल मोटे (माजी सरपंच, वडाळा), डॉ. गायत्री प्रदीप बडाख (डायरेक्टर, बडाख हॉस्पिटल), रश्मी रोहित दसरे (संस्थापक, सई सलोन क्लिनिक अकॅडमी), अॅड. रेणुका पोशेट्टी, अंजली विठ्ठल खाडे आणि विद्या नितीन दरंदले यांचा समावेश होता.

अनसुनी कहानी या विशेष सादरीकरणातून डॉ. सोनल लोढा यांनी सुनीता गडाखांच्या जीवन प्रवासातील संघर्ष, जिद्द आणि यशोगाथा प्रभावी शब्दांत उलगडली. त्यांच्या कार्यातून महिलांना आत्मविश्वास व सकारात्मकतेची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी टॉक शोच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांना सुनीता गडाख यांनी दिलखुलासपणे अभ्यासपूर्वक उत्तरे दिली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

