बिबट्या

आपला जिल्हा-राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा परिसरात शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना शाळेच्या भिंतीवर बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी, राहूरी शहर हद्दीतील जोगेश्वरी आखाडा येथे दि. २० जानेवारी रोजी शिवजयंती निमित्त मराठी शाळेच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, नागरिक तसेच लहान मुले उपस्थित होती. अशा गर्दीच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होणे ही अत्यंत गंभीर बाब असून संभाव्य अनर्थ टळल्याने मोठी दुर्घटना
टळली, असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, शाळेच्या भिंतीवर बिबट्या स्पष्टपणे दिसून आला. या प्रकारामुळे पालकवर्गात विशेषतः चिंतेचे वातावरण आहे. शाळा परिसर आणि निवासी भाग यांच्यात बिबट्याची वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Kavya

नगरसेवक प्रशांत डौले यांनी प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन परिसरात वनविभागाची गस्त वाढवावी, पिंजरा लावून बिबट्याचा—बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

newasa news online
बिबट्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बिबट्या
बिबट्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बिबट्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!