लंघे

नेवासे फाटा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा मिळणार दर्जा !

नेवासा-नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देऊन हे रुग्णालय आरोग्याच्यादृष्टीने अद्यावत करून देण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी विधानसभेत केली.

आ. लंघे यांनी विधानसभेत तालुक्याच्या आरोग्य प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला. नेवासे फाटा येथील ३० बेडचे असलेले हे ग्रामीण रुग्णालय आता १०० बेडचे करून या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केली. नेवासे तालुका हा ९० टक्के ग्रामीण भाग असून, या भागात आरोग्य विभागाने रुग्णांना प्राधान्य देण्याबरोबरच येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना वाहन उपलब्ध नसल्याचे सांगितले. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य विभागातून डायलेसची सुविधा सुरू करण्याची मागणी लंघे यांनी केली. नेवासे तालुक्यात आरोग्य सुविधाचा मोठा अभाव असून प्राथमिक आरोग्य केंद्राना नीटनेटक्या इमारती आणि वाहन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांबरोबरच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना अडचणी येत असल्यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना वाहन सुविधा देण्याची मागणी केली.

लंघे

भेंडा (ता. नेवासे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत ही प्राथमिक आरोग्य केंद्रात पदस्थापना नसल्यामुळे धूळखात पडून असून येथील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी तत्काळ या प्राथमिक आरोग्य केंद्रात पदस्थापना करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार लंघे यांनी विधानसभेत आभार मानून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे नेवासे तालुक्यातील अनेक रुग्णांना मदत झालेली आहे. नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन नगर छत्रपती संभाजीनगर होत महामार्गांवर अपघात असल्यामुळे रुग्णालयाला २९ मे २०२५ रोजी मंजुरी मिळालेली नसल्यामुळे आज पुन्हा आ. लंघे यांनी विधानसभेत पुरवणी मागणी करून प्रकाशझोत टाकला.

लंघे

– कुंभमेळ्यानिमित्त रस्ते दर्जेदार करा
पुढच्या वर्षी २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला देशभरातून भाविक येत असतात. जे भाविक नाशिकला येतात तेच भाविक नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, शनीशिंगणापूर आणि श्रीक्षेत्र देवगड येथे येत असतात. त्यामुळे कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते आणि आरोग्य सुविधा मिळण्याची व्यूहरचना आतापासूनच आखण्याची गरजही असल्याचे आमदार लंघे पाटील यांनी सांगत विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!