
नेवासा : नेवासा बुद्रुक येथे विश्वेश्वर श्री नाथबाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत महंतांच्या उपस्थितीत भंडारा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाथबाबा भक्त असलेल्या ठाणगे परीवाराकडून गेल्या ३५ वर्षांपासून भंडारा परंपरेचे आज ही जतन केले जात आहे.

नेवासा बुद्रुक येथील विश्वेश्वर नाथबाबा समाधी मंदिरामध्ये पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर ठाणगे परिवाराच्या वतीने प्रतिमा पूजन करुन संत पूजनाडरे भंडारा घालण्याची परंपरा कै. शामराव ठाणगे यांनी सुरू केली होती या परंपरेला आज ३५ वर्षे पूर्ण होत आहे.

ठाणगे परिवाराच्या वतीने आयोजित भंडारा कार्यक्रम प्रसंगी मध्यमेश्वर मंदिराचे प्रमुख महंत बालयोगश्री ऋषिनाथजी महाराज, पिचडगाव येथील माऊली आश्रमाचे प्रमुख महंत हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे, संत सेवक हभप लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे यांच्या हस्ते विश्वेश्वर नाथबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या फोटो प्रतिमांचे अनावरण यावेळी करण्यात आले. उपस्थित संत महंतांचे संतपूजन भंडारा कार्यक्रमाचे आयोजक संभाजीराव ठाणगे यांच्या हस्ते करण्यात आले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

