क्रिडा

टाकळीभान येथे नुतन व्यायामशाळेचे उद्घाटन

टाकळीभान-टाकळीभानच्या क्रिडा संस्कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटु घडले असुन यामुळे अहील्यानगर जिल्ह्याचा नावलौकीक देशात वाढला.खेळाला आता चांगले दिवस आले असुन खेळाडुंनी खेळात संयम राखला,प्रयत्नात व सरावात सातत्य राखले तर यश निश्चित असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रिडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले.
टाकळीभान(ता.श्रीरामपुर)येथे जिल्हा क्रिडा विभागाच्या माध्यमातुन ७ लक्ष रुपये निधीच्या नुतन व्यायामशाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी योगेश हजारे,राष्ट्रीय कबड्डी खेळाडु अस्लम ईनामदार,शिवम पटारे,सरपंच अर्चना रणनवरे,उपसरपंच कान्हा खंडागळे,किरणराव धुमाळ,दिलीप लोखंडे,बापुसाहेब नवले,अर्जुन राऊत आदी प्रमुख उपस्थित होते.

क्रिडा

मान्यवरांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन पार पडल्यानंतर बोलताना खुरंगे म्हणाले की,आज मुलांना मैदानावरती आणने हे खरे आवाहन आहे.मोबाईल,टिव्ही आणि समाजमाध्यमांमुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नविन झालेल्या व्यायामशाळेत गावातील प्रत्येक तरुणाने येऊन आपले शरीर व आरोग्य घडवले पाहीजे.टाकळीभान गावाने कबड्डीची परंपरा अनेक वर्षांपासुन जपली आहे.येथुन घडलेले अस्लम ईनामदार व शिवम पटारे हे जिल्ह्यासह राज्याचा नावलौकीक वाढवत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राहुल कोकणे,वसीम ईनामदार,सतिश कांगुणे,संदिप जावळे,गणेश इथापे,प्रशांत कोकणे,किरण बोडखे,अमोल‌ चितळे,सुभाष सपकाळ,मनिष वेताळ आदींसह ओन्ली साई क्रिडा मंडळाचे खेळाडु व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रस्तावना संदीप जावळे यांनी केली,सुत्रसंचलन राहुल कोकणे तर आभार वसीम ईनामदार यांनी मानले.

क्रिडा


टाकळीभान परीसरात क्रिडा संकुल व्हावे हि सर्वांची मागणी असुन त्यासाठी योग्य तो पाठपुरावा सध्या वरिष्ठ पातळीवर सुरु आहे.जिल्हा क्रिडा विभागाने यामधे लक्ष घालुन ही मागणी पुर्ण केली तर ग्रामीण भागातील खेळाडुंना मोठी चालना मिळेल.
-कान्हा खंडा

क्रिडा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रिडा
क्रिडा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रिडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!