महिला दिन
महिला दिना

सोनई | विजय खंडागळे – सोनई येथील आदर्श विद्या मंदिर विद्यालयाने प्राथमिक विद्यालयात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य हिंदुस्थान फिडस तर्फे हजारो विद्यार्थ्यांना टिफिन डबा व बॅगचे वाटप संस्थेचे अध्यक्षा जयश्री गडाख व सचिव रविराज गडाख,कंपनीचे सेल्स मॅनेजर सातपुते व मा. नरसिंह कुलाडे, ग्राहक सेवा अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवराच्या हस्ते 1 ली ते 5 वी वर्गातील 870 मुलांना भेटवस्तू देऊन एक सामाजिक उपक्रमचा आदर्श घालून दिला.

महिला दिना

यावेळी सोनई व परिसरातील अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना सन्मानपूर्वक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानासवाडी या संस्थेचे सचिव श्री रविराज तुकाराम पा गडाख यांनी भूषविले तर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई रविराज गडाख यांच्या शुभहस्ते उपस्थित 150 अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. तर हिंदुस्थान फीड्स कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर श्री. पांडुरंग सातपुते , सेल्स ऑफिसर नरसिंह कुलाडे, ग्राहक सेवा अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाला आहे.

महिला दिना

प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक श्री अनिल दरंदले यांनी संस्थेचे अध्यक्ष जयश्रीताई गडाख व सचिव रविराज गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची आदर्शयुक्त माहिती दिली.कार्यक्रम प्रसंगी पांडुरंग सातपुते यांनी “गाय व माय” याबद्दल माहिती देताना म्हणाले,गाय आपण चांगला चारा व खाद्य म्हणजे हिंदुस्थान फिडस ची कांडी वापरावी म्हणजे गाय चांगले दूध देईल,म्हणजे माय व मुलगा यांचे आरोग्य चांगले राहील.

महिला दिना

शिक्षक अशोक घावटे यांच्या नियोजनात यश पशुखाद्यचे आदिनाथ घावटे आणि व्यंकटेश पशुखाद्यचे सोमनाथ बंग यांच्या नियोजनाखाली यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती जाधव एम.बी व कोंगे व्ही.जी.यांनी केले. तर आभार श्रीमती दिपाली निमसे मॅडम यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महिला दिना
महिला दिना

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महिला दिना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!