UPSC

आपला जिल्हा – ज्या नगरपालिकेत वडील वॉचमन म्हणून कंत्राटी नोकरीला होते. त्याच पालिकेच्या हद्दीतील एका छोट्याशा घरातून ‘यूपीएससी” (UPSC)चे स्वप्न पाहिले गेले व ते सत्यातही उतरले.श्रीरामपूरचे रोहित नरेश सांगळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८६५ वा रैंक पटकावून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.सांगळे कुटुंबाचा हा प्रवास संघर्षाचे उदाहरण आहे. वडील नरेश सांगळे नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने वॉचमन म्हणून काम करततात.आईने घराबाहेर असलेल्या छोट्या किराणा दुकानातून संसाराचा गाडा ओढला.

UPSC

आपण कष्ट सोसले तरी चालतील पण पोरांनी शिकावं, या जिद्दीतून त्यांनी रोहितला पुण्याच्या नामांकित ‘सीओईपी’ मधून इंजिनिअरिंग पूर्ण करू दिले. रोहितनेही आई-वडिलांच्या घामाची किंमत ठेवत,अभ्यासाचे सातत्य ढळू दिले नाही. सांगळे दाम्पत्याने केवळ रोहितलाच नव्हे, तर आपल्या तीनही मुलांच्या शिक्षणाची वीण घट्ट विणली आहे.
लहान बहीण रविना यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून ‘एमबीबीएस’ पूर्ण केले. सध्या त्या श्रीरामपूर पालिकेतच वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ज्या पालिकेत वडील वॉचमन, तिथेच मुलगी अधिकारी आहे हा एक दुर्मीळ योग कुटुंबाने साधला आहे.धाकटा भाऊ निखिल यानेही ‘बीबीए’ पूर्ण करून ‘एमबीए’चे शिक्षण सुरू ठेवले आहे.

UPSC

रोहितचा हा प्रवास सोपा नव्हता. यापूर्वी त्याची निवड ‘ईपीएफओ’ विभागात अकाउंटंट अॅण्ड एनफोर्समेंट ऑफिसर (वर्ग-२) या पदावर झाली होती. सध्या ही जबाबदारी पार पाडत असताना रोहितने कोणताही महागडा क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर ‘यूपीएससी’त यश मिळवले.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

UPSC
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

UPSC
UPSC

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

UPSC

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!