देवगड फाटा (वार्ताहर) : नेवासा तालुक्यातील खडका फाटा परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. २ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव सतीशव संतोष परदेशी (वय ३३, रा. जळके खुर्द, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश परदेशी हे त्यांच्या युनिकॉर्न (क्र. MH-17-DF-1488) या दुचाकीवरून अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरून जात असताना खडका फाटा येथील डिव्हायडरजवळ समोरून येणाऱ्या इर्टिगा कार (क्र. MH-50-U-2321) चालकाने भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश परदेशी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे नातेवाईक अतिष संतोष परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक राजाराम निवृत्ती कनसे (रा. आंगापूर, ता. सातारा, जि. सातारा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष धोंडिबा राठोड करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

