पोलीस
पोलीस

आपला जिल्हा – जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील ७३ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून लेखी परीक्षा येत्या रविवारी (१५ मार्च) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी मैदानी चाचणीतून एकूण ९३४ उमेदवार पात्र ठरले असून ही परीक्षा अहिल्यानगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज येथे सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे.

पोलीस

जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे (हॉल तिकिट) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षेची वेळ सकाळी ११ वाजता असली तरी उमेदवारांनी सकाळी ९:३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच सकाळी १०:३० नंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलीस

अहिल्यानगर जिल्हा पोलीस घटकाच्या आस्थापनेवरील ७३ रिक्त पदांसाठी ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पोलीस मुख्यालय येथे उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी एकूण चार हजार १४८ उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार ४९७ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणीत सहभाग नोंदविला.

पोलीस

मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या उमेदवारांपैकी १ हजार ३८० उमेदवारांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शासनाच्या १:१७ या नियमाप्रमाणे उपलब्ध ७३ पदांच्या प्रमाणात ९३४ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी तात्पुरते पात्र घोषित करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांची यादी जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीसंदर्भात काही आक्षेप किंवा हरकती असल्यास उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अधिकृत ईमेलवर लेखी स्वरूपात हरकती सादर करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते.

पोलीस

दरम्यान, लेखी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत पार पडणार असून परीक्षेचा कालावधी दीड तासाचा असेल. एकूण १०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेसाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!