
नेवासा :मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओंवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी डॉ. संजय बिरादार यांनी सांगितले.

डॉ. बिरादार यांनी म्हटले की, भारत निवडणूक आयोगाने एप्रिल २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू करण्याचे निश्चित केले आहे, त्या अनुषंगाने नेवासा विधानसभा मतदारसंघातील २७६ बीएलओंयांना सप्टेंबरमध्ये २००२ व २०२४ च्या मतदार याद्या देण्यात आल्या होत्या. त्यानुसार २००२ च्या मतदार यादीतील मूळ मतदार व त्यांचे नातेवाईक यांची नावे २०२४ च्या मतदारयादीतील मतदारांशी मॅपिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु ५ महिन्याचा कालावधी उलटून देखील काही बीएलओंनी
कामकाज सुरु केलेले नाही, असे निदर्शनास आले आहे. कामकाज पूर्ण न केल्यास संबंधित बीएलओवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या नेमून देलेल्या राष्ट्रीय कामकाजाबाबत गांभीर्य नसल्याचे व सदर कामकाजात अक्षम्य हलगर्जी पण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा कामचुकार व निवडणूक आयोगाच्या महत्वाचे काम नाकारणाऱ्या बी एल ओ यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाही करण्यात येऊन त्यांचे विभागीय चौकशीचे प्रस्ताव वरिष्टाकडे सादर करण्यात येणार असल्याचे तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ संजय बिरादार यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

