
नेवासा : दरवर्षी प्रमाणे आषाढी पायी दिंडी पंढरपूर पालखी सोहळयाच्या नियोजनासाठी शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. असे मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांनी सांगितले.

दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने नियोजनाकरिता १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात महंत रामभाऊ महाराज राऊत, सर्व दिंडी चालक, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

१३ तारखेला या बैठकीस सर्वानीच उपस्थित राहण्याचे आवाहन वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी दिंडी चालक व वारकऱ्यांना केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

