देवस्थानच्या ॲप घोटाळ्याबद्दल तर सर्वत्र माहीतच आहे परंतु अद्यापही सर्वसामान्य भाविकांची लूट थांबलेली नाही हा मोठा गंभीर विषय आहे.
नाशिक विभागाचे आयुक्त गेडाम यांची वेशांतर करून केलेली कारवाई उपयोग ठरलेले नाही हे यावरून स्पष्ट होते.
असाच काहीसा प्रकार श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांच्या बाबतीत घडलेला आहे येणाऱ्या भाविकांची पूजेचे ताट देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी या लूट करणाऱ्यांना जरब देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर दुकानदारांनी भाविकांना अक्षरशः दादागिरी शिवीगाळ करीत पैसे उकळण्याचा हा प्रकार अतिशय निंदणी आहे.
पूजा साहित्याची विक्री व त्यातून भाविकांची लूट कायमस्वरूपी बंद होणार का असे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे .
शिरीष सुजाता घोडनेकर वय 21 राहणार मुरुड जंजिरा जिल्हा रायगड यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेले असून त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की येथील दुकान क्रमांक 33 नारळ सेंटर
येथे ही घटना घडली.

यामध्ये आरोपी किरण रामदास जाधव आणि श्रीकांत विजय साठे यांनी खरेदी भाविकास शिवीगाळ व दमदाटी केली एक पूजेचे ताटाची किंमत बाराशे रुपये प्रमाणे अवाजवी सांगून त्यांच्याकडून गुगल पे द्वारे सातशे रुपये वसुल केले.
ग्रंथाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोकाटे हे करीत आहेत.
शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी भाविकांना आवाहन केले आहे की असला प्रकार घडले असते त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा त्यांची सर्वतोपरी मदत करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

