नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती ग्रामीण मुलींचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राजमाता जिजाऊ छात्रसेवा काल ग्रुपच्या वतीने श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकिंदपूर येथे निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख श्रीमती अंजली होन या होत्या. यावेळी विद्यार्थिनींना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व सांगत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शुभांगी भागवत, प्रा.प्रतिभा घुगे, प्रा.स्वप्निल बिरदवडे व प्रा.सारिका नागरे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सर्व पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य सोपानराव काळे, महाविद्यालयाच्या समन्वयिका डॉ.अनुराधा गोरे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापिका कोमल गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

