नेवासा : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. भानसहिवरे महसूल मंडळाच्या वतीने शनिवार, दि. १४ रोजी नेवासे फाटा (मुकिंदपूर) येथील जी. के. मंगल कार्यालयात हे शिबिर संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाधिकारी सरिता मुंडे यांनी दिली आहे.

या भव्य शिबिराचे उद्घाटन आ. विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दाखले, जमिनीचे वाद आणि इतर दैनंदिन प्रश्नांचे जागेवरच निराकरण करून तक्रारी सत्वर निकाली काढणे, हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे.

भानसहिवरे मंडळातील नेवासे फाटा, सुरेशनगर, मक्तापूर, पिचडगाव, नागापूर, रांजणगाव देवी, सौंदाळे, खुणेगाव आणि उस्थळ दुमाला या गावांतील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाधिकारी सरिता मुंडे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी आकाश जोशी, श्वेता काळे, रमेश रिंडे, सोमनाथ गलांडे आणि गोरक्षनाथ दराडे यांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

