नेवासा धाराशिव येथील केवल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सवानिमित्त ५ व्या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी सर्वेश सचिन सदावर्ते याने खुल्या गटातून राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या य प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून एकूण ६६ स्पर्धक सहभागी झाले हो-ते. या सर्वांवर मात करत सर्वे शने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने परीक्षकांची मने जिंकली आणि केवल फाउंडेशनच्या वतीने त्याला रोख दोन हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. विजेतेपद मिळवले.
सर्वेशला लह-निपणापासूनच वाचन आणि वक्तृत्वाची आवड आहे. सार्वजनिक कार्यक्रमांत व्याख्याने देणे आणि महापुरुषांच्या जयंती उत्सवात सहभागी होऊन इतरांना वाचनासाठी प्रेरित करण्यात तो नेहमीच अग्रेसर असतो. त्याच्या या यशात येथील भाऊसाहेब देशमुख सार्वजनिक वाचनालय, कुकाणा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व आई वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले.या यशाबद्दल सर्वेशचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

