संत ज्ञानेश्वर

नेवासा-नेवासा तसेच रामायणकालीन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आधुनिक डिजिटल संग्रहालय उभारण्यासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार वाकचौरे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली.

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर महाराजांचीकर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळीच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना केली. तसेच येथे असलेले मोहिनीराज मंदिर हे भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराशी संबंधित प्रसिद्ध मंदिर असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या तीर्थक्षेत्राचा स्वदेश दर्शन योजना किंवा प्रसाद योजनेअंतर्गत समावेश करून ते महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे पैठण व शिर्डी यांच्याशी जोडण्याचा विचार करावा. ज्यामुळे या भागातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असेही खासदार वाकचौरे यांनी पत्रात नमूद केले आहे. या सर्व स्थळांचे पुरातत्व विभागामार्फत पुरातत्वीय सर्वेक्षण करून त्यांना नाशिक (पंचवटी) समवेत जोडत रामायण सर्किटमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणीही खासदार वाकचौरे यांनी केली. या पवित्र स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार वाकचौरे यांनी केली.

संत ज्ञानेश्वर

राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही

वाकचौरे यांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री शेखावत यांनी सांगितले की, अहिल्यानगर येथील नेवासा परिसरातील लाडमोड टेकडी जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्‌गीतेवर प्रसिद्ध प्रवचन दिले होते. या स्थळाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून पुरातत्व स्थळ व अवशेष अधिनियम १९५८ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारकडून नेवासा तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारकडे अद्यापि कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

संत ज्ञानेश्वर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संत ज्ञानेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!