नेवासा-महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ८ व्या हप्त्याचा ाभ देण्यासाठी शासनाने रु. १७७४ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे दरवर्षी ६००० रुपयांची मदत (रु. २००० चे तीन हप्ते) थेट बँक खात्यात जमा केली जाते, जी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेला जोडलेली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक आधारं मिळावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये तीन समान हप्त्यांत दिले जातात. योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना २१ हप्ते मिळाले आहेत. महिन्यापूर्वीच २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असून प्रत्येकी २,००० रुपये जमा झाले आहेत. आता महाराष्ट्र राज्य शासनानेही या योजनेच्या ८ वा हप्त्यासाठी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. १७७४ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

