रॉकेल

नेवासा – राज्यात घरगुती गॅसच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून बाजारात मोठ्या प्रमाणावर रॉकेल उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे दिली.
तसेच घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

रॉकेल

सध्या इराण-इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे राज्यात घरगुती गॅससह इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. घरगुती गॅस केंद्रांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी काल
निवेदन केले. आहे. एलपीजी उत्पादनातील अडचणी दूर करण्याचे कामही सुरू असून सध्याच्या परिस्थितीत घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. तसेच उपलब्ध गॅसमधून रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि स्मशानभूमींना एलपीजी पुरवठ्यात १०० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. औषध, उद्योग आणि संरक्षण क्षेत्रातील उपहारगृहांना एलपीजी वितरणात ५० टक्के प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

रॉकेल

राज्यात सध्या रॉकेलचा पुरेसा साठा आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना रॉकेल देण्यासंदर्भात न्यायालयाने यापूर्वी निर्बंध घातले होते. मात्र, सद्यस्थिती लक्षात घेता सर्वांना रॉकेल उपलब्ध करून देण्याबाबत न्यायालयाला कळविण्यात आले आहे. त्यामुळे रॉकेलचे वितरकांमार्फत वितरण करता येईल. मात्र पूर्वी रॉकेल बंद झाल्यामुळे वितरकांची साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएलच्या पेट्रोल पंपांवर रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. एलपीजीचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. केंद्राकडून एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात आले असून रांगा, काळाबाजार किंवा साठेबाजी रोखण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आतापर्यंतच्या कारवाईत १ हजार २०८ गॅस सिलींडर आणि सुमारे ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

रॉकेल
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रॉकेल
रॉकेल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रॉकेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!