पाचेगाव फाटा (वार्ताहर) अत्याधुनिक शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा परिषद शाळांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या स्थानिक विकास निधी २०२५-२६ अंतर्गत डिजिटल स्कूल संकल्पना राबविणेच्या उद्देशाने नेवासा तालुक्यातील ३५ शाळांना १ कोटी ४५ हजार रुपयांचे अद्ययावत शिक्षण साहित्य नुकतेच देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शाळांना अद्ययावत शिक्षण साहित्य उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झालेले आहे.त्या अनुषंगाने नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिक्षक व मुख्याध्यापकांकडून विविध ३५ शाळांना इंटरअॅक्टीव्ह पॅनल, ई लर्निंग सॉफ्टवेअर, कीबोर्ड, माऊस, ऑफ लाईन यूपीएस (१ के व्ही) हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

तथापि, उपरोक्त कामाकरिता आमदार स्थानिक विकास निधी २०२५-२६ अंतर्गत सोबत जोडलेल्या यादीतील शाळांना उपरोक्त प्रमाणे साहित्य उपलब्ध करून देणे कामी रक्कम रू १ कोटी ४५ हजार र लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तालुक्यातील ३५ शाळांना अद्ययावत शिक्षण साहित्य देण्यात आले असून त्यात एक शाळेला या शिक्षण साहित्य साठी जवळपास २ लाख ८७ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आ.विठ्ठलराव लंघे यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.या कामास तात्काळ मंजुरी देण्यात येऊन व सदर कामाकरिता कार्यान्वयण यंत्रणा जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी युद्ध पातळीवर राबविले आहे.

याच फायदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सक्षम करण्यासाठी होऊन विद्यार्थ्यांना संगणक प्रणाली साठी फायदा होणार आहे.
धनगरवाडी,खामगाव, नं १,गिडेगाव,वरखेड,रामडोह,
चिलेखनवाडी,कुकाणा,रिथेवस्ती,तेलकुडगाव,गेवराई, नजिक चिंचोली,पाथरवाला,नांदुर शिकारी,शिरसगाव,सुलतानपूर निंभारी,राजळे वाडी,जैनपूर जुने,पाचेगाव,पुनतगाव जूने,नेवासा बु,बहिरवाडी,निपणीनिमगांव,गोंडेगाव,
कौठा,माका,मांडेगव्हाण,लोहोगाव,राजेगाव,खेडले काजळी,भेंडा फॅक्टरी,बेल्हेकरवाडी,कण्हेर वस्ती,वडाळा ब,तामसवाडी तालुक्यातील या परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक ३५ शाळांना आ विठ्ठलराव लंघे यांच्या स्थानिक विकास निधीतुन अद्ययावत शिक्षण साहित्य भेट दिले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

