सोनई घोडेगाव येथील उपबाजारात गोणी कांदा लिलाव नावारूपास आल्यानंतर आता नेवासे येथील बाजार समितीच्या सहा एकर जागेत मोकळ्या कांद्याचा लिलाव सुरू करण्याची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. विश्वासार्हता व एका हाताने माल देऊन दुसऱ्या हाताने जागेवर पैसे भेटणार असल्याने शेतकऱ्यांकडून वरील निर्णयाचे स्वागत होत आहे.

बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सूचनेनंतर घोडेगाव येथे सोमवार, बुधवार व शनिवारी गोण्यातून आलेल्या कांद्याचा लिलाव सुरू झाल्यानंतर येथील पारदर्शकता व रोख पेमेंट पद्धतीने वर्षभरातच येथील उपबाजार नावारूपास आला आहे. उपबाजारात खूप वर्षापासून सुरू असलेला जनावरांचा
बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. बाजार, लिलाव व आठवडे बाजारामुळे गावाचा आर्थिक स्तर मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. तालुक्यात तसेच पाथर्डी, शेवगाव, गंगापूर, वैजापूर व अन्य तालुक्यातून घोडेगावात कांद्याच्या गोण्या येत असतात.

कांदा काढणी सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी व्यवस्था व गोण्या भरणे परवडत नसल्याने शेतातच व्यापाऱ्यास कांदा देत होते. यामध्ये अनेकदा रक्कम वेळेवर भेटण्यास अडचण आली आहे. शेतातून काढलेला कांदा टॅम्पो, ट्रॅक्टर व अन्य साधनात मोकळा घेऊन जाणे सोपे असल्याने नेवाशात लिलाव घेण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत व्यापाऱ्यांची एक बैठक होऊन उपक्रम अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात प्रत्यक्ष लिलाव होण्याची शक्यता आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






