
नेवासा – तालुक्यातील भेंडा येथील कारखाना पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या पाटात बुडून एका बँड गायकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर बातमी अशी की,स्वप्नील लक्ष्मण मगरे वय 32 (पाथरवाला बु,ता अंबड जिल्हा जालना) गायक हे मनमाड येथील कार्यक्रम संपवून सर्व सदस्यांसह रात्री मनमाड येथून निघाले होते त्यानंतर ते भेंडा कारखाना येथील पेट्रोल पंपावर आराम करण्यासाठी झोपले सकाळी सुमारे ८.३० वाजता त्यांना मढी येथे कार्यक्रमासाठी जायचे होते सकाळी आंघोळीसाठी पेट्रोल पंपाच्या मागील पाटात गेले असता त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

त्यांनतर आज दि.१८ रोजी दुपारी अंदाजे १.३० वाजता त्यांचा मृतदेह पाटात सापडला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता त्यांच्या माहिती नुसार सदर मयत हा पट्टीचा पोहणारा होता तो बुडूच शकत नाही त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू की घातपात? हे शवविच्छेदन झाल्यावर स्पष्ट होणार आहे सदर मयताचा मृतदेह हा छत्रपती संभाजीनगर येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






