परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कॉलेज प्रशासनाने केले.
पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे शैक्षणिक २०२४-२५ वर्ष बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET २०२५) ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीसीबी व पीसीएम अश्या दोन्ही विषयांसाठी पूर्णपणे कॉलेजच्या माध्यमातून मोफत क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या कलासेससाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. बेलपिंपळगाव, घोगरगाव, नेवासा, नेवासाफाटा, करजगाव, मांजरी या गावांमधील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था अल्पश्या दरात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. निवासी विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय देखील मोफत देण्यात येत आहे.

सदर महाविद्यालयात सन २०१८-१९पासून डी फार्मसी, बी फार्मसी कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल केले आहे. नव्याने सुरू झालेल्या एम फार्मसी कोर्समुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी एक चांगले केंद्र उपलब्ध झाले आहे. सदर सीईटी २०२५ च्या मोफत क्लासेस साठी प्राचार्या डॉ मेघा साळवे,प्रा डॉ अभिजीत शेटे, प्रा बाबासाहेब चोपडे, प्रा. किशोर नरोटे, प्रा. प्रसाद नांदे तसेच प्रा. वैष्णवी आव्हाड असा अनुभवी शिक्षक वर्ग उपलब्ध आहे. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार व प्राचार्य डॉ मेघा साळवे यांनी सदर क्लासेस साठी परिसरातील विद्यार्थ्यांनी भरपूर संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्या दिवशी जवळपास ३६ मुला, मुलींनी आपला प्रवेश घेतला. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात येतआहेत.गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ बाळासाहेब पवार सदैव कार्यशील असतात.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.