ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
हत्या

नेवासा – शिर्डी शहर दुहेरी हत्याकांडातून सावरत नाही तोच एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच जन्मदात्या –वडिलांची लोखंडी पाईपने-मारहाण करत हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शुभम गोंदकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक रणजित गलांडे यांनी दिली. घरगुती वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईपने जबर मारहाण केली असून या मारहाणीत ५४ वर्षीय दत्तात्रय शंकर गोंदकर यांचा मृत्यू झाला आहे. मारहाणीतून दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले असून शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

हत्या

या घटनेत आरोपी मुलगा शुभम गोंदकर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी शुभम गोंदकर यास मंगळवारी राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले. सदरची घटना ६ मार्च रोजी घडली होती, मात्र या घटनेचा पाच दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला, पण शवविच्छेदन अहवालाने हत्या झाल्याचे स्पष्ट केले. मयताचा – मुलगा आरोपी शुभम दत्तात्रय गोंदकर याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने शिर्डी शहर पुन्हा हादरले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

हत्या
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हत्या
हत्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!