नेवासा – राहुरी सोनई ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यासाठी अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी नोटीस दिल्याने सोनईतील व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
उपविभागीय अभियंता यांनी महामार्गाची पाहणी केली असता राहुरी सोनई-शिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० सी वरील साखळी क्रमांक ०/०० ते २६/१६० रस्त्याच्या हद्दीत अवैधरित्या अतिक्रमण केल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग जमीन व वाहतूक नियम २००२ कलम २६ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. महामार्गाच्या हद्दीत रस्त्याच्या मध्यापासून प्रत्येकी दोन्ही बाजूस १५ मीटर करण्यात आलेले अवैध अतिक्रमण नोटीस मिळालेल्या तारखेपासून आठ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावे.

अतिक्रमण स्वतः काढून न घेतल्यास सदरचे अतिक्रमण खात्यामार्फत काढले जाईल व होणाऱ्या नुकसानीस आपणास जबाबदार धरून संपूर्ण सरकारी खर्च आपल्याकडून दंडासह वसूल केला जाणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.
सोनई-घोडेगाव रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना मागील काही दिवसांपूर्वी नोटिसा दिलेल्या असून आता राहुरी सोनई शिंगणापूर रस्त्यावरील व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आलेल्या असल्याने सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत.
अनेक व्यावसायिकांनी व्यवसायासाठी कर्ज काढलेले आहे. अनेक व्यावसायिकांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार असून व्यवसायावर काम करणारे हजारो युवकही बेरोजगार होऊन कुटुंबाची अवस्था बिकट होणार आहे. अनेक व्यावसायिकांनी विविध बँकांचे कर्ज, होम लोन, व्यवसाय कर्ज काढले असल्याने त्यांच्यावर बँक कर्जाच्या हप्त्याचे काय करायचे या चिंतेत आहेत. सोनईत नोटीस बजावण्यात आली असल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.