नेवासा – तालुक्यातील जेऊर हैबत्ती ते ताके वस्ती रस्ताचे काम सध्या सरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याबाबत ग्रामस्थाच्या सांगण्यात येत आहे मुख्य रसत्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ मंडळी कडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्ताचे काम अतिशय धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे चालू आहे अवघ्या पंधरा दिवसांत सदरिल रस्ताला खड्डे पडले आहे काही ठिकाणी डांबर निघाले आहे हे काम त्वरित बंद करून मा. उपविभागीय अभियंता यांनी कामाची पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे तो पर्यत पुढील काम चालू करू नये, तसेच या कामाची ठेकेदाराला कुठलेही बिल अदा करू नये ठेकेदाराने त्याच्या पद्धतीने काम सुरु ठेवलेले आहे. सदरचे काम बंद करावे, अन्यथा ग्रामस्थ यांच्या वतीने काम बंद करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

सदरिल रस्ता हा गांवचा मुख्य असल्याने रस्ता हा गुणवत्ता पूर्वक होणे गरजेचे आहे गावाला जोड़नारा हा एकमेव रस्ता आहे अतिशय निकृष्ट काम सध्या सरू आहे.
– गणेश ताके, शिवसेना युवा नेते.
ठेकेदार व अधिकारी संगणमताने या रस्त्याचा दर्जा निकृष्ट बनवत आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे तसे नसेल तर संबंधित आधिकारी यांनी या कामाची चौकशी सुरु करावी असे देखील बोले जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.