नेवासा – सध्या महागाई गगनाला भिडली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच सध्या भाजीपाला, फळं यांचेही दर वाढताना दिसत आहेत. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता दुधासाठी २ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. कारण दूध उत्पादक संघाकडून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक बुधवार (१२ मार्च) रोजी घेण्यात आली. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीत दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाची किंमत ५६ वरून ५८ रुपये इतकी केली जाणार आहे. तसेच म्हशीच्या दुधाच्या किंमतीतही २ रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे म्हशीच्या दुधाची किंमत ७२ वरून ७४ रुपये इतकी होणार आहे.
आजपासून वाढीव दर लागू
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ रुपयांप्रमाणे दरवाढीचा निर्णय एकमताने झाला आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाढीव दर येत्या १५ मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.