नेवासा – नगरपंचायतीने २०२१ मध्ये सार आयटी या खासगी कंपनीला शहरातील मालमत्ता कर आकारणीसाठी सर्वेक्षणाचे कंत्राट दिले होते. गेल्या चार वर्षांत या कंपनीने बरेचसे काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला. असे असले ती नागरिकांना प्रत्यक्षात हे सर्वेक्षण होत असल्याचे कधीही दिसले नाही. त्यामुळे संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रियेवर नागरिकांकडून संशय व्यक्त केला. सदरचे मालमत्ता सर्वेक्षण पुन्हा एकदा करण्याची मागणी होत आहे. चुकीच्या सर्वेक्षणामुळे करदात्यांवर कायमस्वरूपी आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचा आरोप, नागरिकांनी केला.फेर सर्वेक्षणाची मागणी करणारे सुनील वाघ यांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीने अंदाजे सर्वेक्षण करून मालमत्तांचा कर निश्चित केला.

यामध्ये कोणते वैज्ञानिक निकष लावण्यात आले, याबाबत स्पष्टता नाही. विशेष म्हणजे हा सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण नव्हते, असे दिसून आले. त्यामुळे सर्वेक्षणाच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. असेच चुकीचे सर्वेक्षण कर आकारणीसाठी वापरले, तर संपूर्ण नेवाशातील नागरिकांना कायमस्वरूपी आर्थिक तोटा होणार आहे. अशाप्रकारे बोगस सर्वेक्षणावर आधारित कर निश्चित केले जाणार आहेत आणि सदरचे कर निर्धारणासाठी नगरपंचायतीने नागरिकांना आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले. असे असले तरी संबंधित सर्वेक्षणाच्या प्रती नागरिकांना मिळाल्या नाही. त्यामुळे आक्षेप नोंदवायचा कसा, असा प्रश्न नेवाशातील नागरिकांसमोर आहे.
नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसांत हरकती नोंदवा
आमचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. परंतु अद्याप कोणत्याही प्रॉपर्टीचे नोटीस जारी केलेली नसल्याने नागरिकांनी नोटीस मिळाल्यानंतरच ३० दिवसांच्या आत हरकती घेण्यास यावे, असे सार आयटी संस्थेचे पथक प्रमुख महेश चौगुले यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.