नेवासा – महिला व बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर मार्गदर्शित ज्ञानेश्वरी लोकसंचलीत साधन केंद्र, नेवासा नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत महिला विकास महामंडळ अंतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तुचे भव्य प्रदर्शनतालुकास्तरीय भव्य नवतेजस्विनी महोत्सव २०२५१८ मार्च २०२५ ते २ मार्च २०२५ रोजी वेळ : सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत संत नागेबाबा भक्त निवास भेंडा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर ग्रामिण व शहरी भागातील बचत गटातील महिला बँक कर्ज व अंतर्गत कर्ज घेऊन व विविध योजनेचा लाभ घेऊन उद्योग व्यवसाय करीत आहे. या महिलांच्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या करिता नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती प्रदेश भाजपाच्या महिला सचिव सौ. अमृताताई नळकांडे यांनी दिली

यावेळी बचत गटातील महिलांचे १०० पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार असुन या तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२५ ला देऊन खरेदीचा आनंद घ्यावा व महिलांचे मनोबल वाढवावे असे भाजपा महिला नेत्या सौ. अमृताताई नळकांडे यांनी सांगितले. या तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२५
नाचणीचे बिस्कीट, विविध प्रकारचे जाम, विविध प्रकारचे मसाले, सर्व प्रकारचे पापड, कर्जतची प्रसिद्ध शिपी आमटी, गावरान तूप, कापडी पिशव्या, बाजरीची भाकर, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, शेंगदाणे, कराळे, तीळ, खोबरे चटण्या, मांडे, पाणीपुरी, भेळपुरी, आप्पे, सोयाबीन चिल्ली, विविध प्रकारचे लोणचे, बर्फाचा गोळा, लेडीज ज्वेलरी, वडापाव, भाजे, उन्हाळी पदार्थ, अस्सल चहा पावडर, आयुर्वेदीक हळद, कपडे, चपला, बांगड्या, कडधान्य, खेळणी यांसह परदेशात गाजलेले माठातले लोणचे, सतरंजी, सोलर उत्पादने यांसारख्या विविध वस्तू खरेदी करण्याची सुवर्ण संधी महिलांना मिळणार आहे असे सौ. अमृताताई नळकांडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे स्वरूप १८ तारखेला उद्घाटन समारंभ, रांगोळी स्पर्धा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, १९ तारखेला वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायंकाळी भारुडाचा कार्यक्रम. २० तारखेला कवीसंमेलन, उखाणे स्पर्धा व सायंकाळी क्रांतीनाना माळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. या २० मार्च रोजीच कार्यक्रमाची सांगता होणार असून हा तेजस्विनी महोत्सव सर्व महिला भगिनींसाठी आणि सर्वांसाठी खुला असल्याने नेवासा तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या तेजस्विनी महिला महोत्सवाला हजर राहावे असे आवाहन प्रदेश भाजपा महिला सचिव सौ. अमृताताई नळकांडे यांनी केले आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.