नेवासा | नाथाभाऊ शिंदे – नेवासा तालुक्यातील शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता मिळून देण्यासाठी व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद चळवळ ही श्री शरद राव पवळे चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे राज्य समन्वयक श्रीगोंदा येथील जंगलेवाडी चे श्री दादासाहेब जंगले पाटील व महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे यांनी सुरू केलेल्या
नेवासा तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व तिसऱ्या गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये जनन्याय दिन आयोजित केला जातो.

नुकताच दिनांक 20 मार्च 2025 रोजी या जनन्याय दिना मधून नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, नायब तहसीलदार किशोर सानप, नायब तहसीलदार (संजय गांधी योजना) श्री संदीप चिंतामणी साहेब रोजगार हमी योजना अव्वल कारकून श्री शिरीष डी कुलकर्णी लिपिक श्री उमाप यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष प्रकरणे हाताळली 143 व ५/२ ही रस्ता प्रकरणे नेवासा तालुक्यात पेंडिंग राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे यावेळी डॉक्टर संजय बिरादार यांनी सांगितले त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. कार्यालयातील कर्मचारी श्री झिने यांनी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपालन चळवळ समिती जनन्याय दिन चा फलक तहसील कार्यालय मध्ये लावला.

यावेळी गेल्या आठवड्यात नेवासा तालुक्यातील भेंडा कुकाना, सुरेगाव गंगापूर, बेल पांढरी, लोहगाव पानसवाडी, तेलकुडगाव भातकुडगाव शिव रस्ता हत्तीच्या खुणा निश्चित करून दिल्या म्हणून तत्परता दाखविल्याबद्दल तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांचा चळवळीच्या वतीने उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छबुके देऊन सन्मान केला चांगल्या कामासाठी चळवळीच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार करणं हे क्रमप्राप्त आहे पोलीस ठाणे नेवासा यांच्याकडून शिवरस्ता हद्दी खुणा व रस्ता खुला करण्यासाठी विनाशुल्क मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध केला म्हणून नेवासा पोलीस स्टेशनचे पीआय श्री धनंजय जाधव यांचाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री नाथाभाऊ शिंदे व राजू गरड व सगाजी ऐनर व चळवळीचे कार्यकर्त्यांनी सन्मान केला.

सर्व समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी डाक बंगला शासकीय विश्रामगृह नेवासा मधून मीटिंग आयोजित करून तहसील कार्यालयात जनन्याय साठी प्रवेश केला. या जनन्यायदिनातून उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री संदीप गोसावी साहेब यांनी प्रत्येक महिन्याला तीन शिवरस्ते विनाशुल्क व मोफत खुले करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेतला या जन न्याय दिनाचे वेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील, श्री सागर सोनटक्के, बाळासाहेब थोरात विठ्ठल करमड. संभाजी पवार प्रवीण पवार, श्री शैलेश नारायणराव सुरुडे, जानकु रुपनर,साहेबराव आखाडे श्री संतोष भाऊसाहेब शिंदे कुशाबा फुल सौंदर रमेश भक्त, सोमनाथ माकोणे रामभाऊ पवार, मुरलीधर जरे चांगदेव आरगडे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते पुढील जन्यादिन एप्रिल 25 च्या पहिल्या गुरुवारी म्हणजे 3 एप्रिल 25 रोजी होईल असे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी जाहीर केले जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या जनन्याय दिनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.