श्रीरामपूर – मोरया फाउंडेशन आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास स्मरण सभा श्री म्हसोबा महाराज चौक, पूर्णवादनगर येथे संपन्न झाली. यावेळी माजी नगरसेविका सौ.स्नेहल खोरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रवीण पैठणकर, किसन ताकटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे हिंदू धर्माची आस्था टिकली आहे. ज्यावेळी साक्षात मृत्यू समोर असताना शंभूराजेंनी धर्म परिवर्तनाचा प्रस्ताव धुडकावत मृत्यूला कवटाळले. ९ ते १० वर्षांच्या त्यांच्या शासन काळात १२० लढाया लढल्या आणि सर्व लढाया जिंकत हिंदवी स्वराज्य वाढविल्याचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवास्पद इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा बलिदान मास स्मरण सभेचा उद्देश असल्याचे सांगत यापुढे दरवर्षी प्रभागात बलिदान मास स्मरण सभा घेण्याचे केतन खोरे यांनी जाहीर केले.

श्री शिवप्रतिष्ठानचे शहर विभाग प्रमुख किसन ताकटे व प्रविण पैठणकर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासपट मांडत श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे शनिवार २९ मार्च २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता शहीद भगतसिंग चौक येथून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणजेच मुकपदयात्रा निघणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या मूकपदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. तर वरद यशवंतने श्लोक पठन केले.

यावेळी किशोर चौधरी, मोरे साहेब, विजय पाटील, आदिनाथ पाटील, विलास भगत, अण्णासाहेब पंडीत, विशाल रुपनर, सोमनाथ लाड, योगेश ओझा, अमोल माळवे, संतोष होते, राहुल सागडे, हर्षल फोपसे, अशोक यादव, बापू शेलार, गणेश पोपळघट, संकेत नागरे, कुणाल दहिटे, विवेक भोईर, सीमा पटारे, अलका राऊत, संगीता पंडित, तृप्ती भगत, अनिता गोरे, अनिता पाटील, वर्षा भोईर, सविता घोडेकर, रेखा होते, दिशा सागडे, खुशबू कासलीवाल, विद्या गागरे, कोरडे ताई, शीला फणसे, लोखंडे ताई, राजूळे ताई, गायकवाड मावशी, चांडवले ताई आदींसह प्रभागातील अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.