ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

चांदा | प्रा.रावसाहेब राशिनकर – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथे प्राचार्य हरीभाऊ कृष्णाजी जावळे यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.प्राचार्य हरीभाऊ जावळे हे उत्कृष्ठ शिक्षक व उत्तम प्रशासक असून त्यांनी संस्थेत दिलेले योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष रामचंद्र हरिभाऊ दरे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना केले. जावळे सर हे अभ्यासू, कामसू व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे अशा शब्दांत संस्था सचिव अँड.विश्वासराव आठरे पाटील यांनी प्राचार्य जावळे यांच्या कार्याचा गौरव केला. संस्थेच्या यशस्वीतेमध्ये सर्व स्थानिक पातळीवर काम करणारे, प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे असेही ते म्हणाले.

शिक्षक

प्राचार्य जावळे सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे असून विद्यार्थ्यांनी सरांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा हे गुण आत्मसात करावेत अशा शब्दांत संस्थेचे सह सचिव जयंत रामनाथजी वाघ साहेब यांनी सरांचे कौतुक केले. प्राचार्य जावळे सर हे हाडाचे शिक्षक,उत्तम मार्गदर्शक व प्रशासक आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ विश्वस्त जी.डी. खानदेशे साहेब यांनी काढले. विद्यार्थी व शिक्षकांनी परिस्थितीचे भांडवल न करता निष्ठेने व तत्परतेने काम करत राहावे असे प्राचार्य हरीभाऊ जावळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. कार्यक्रमप्रसंगी संस्था खजिनदार अँड.दीपलक्ष्मी म्हसे, संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ दीपक शिंदे,नानासाहेब अंबाडे, नानासाहेब शिंदे,प्रा.अशोक चौधरी, विजयाताई अंबाडे,उप प्राचार्य रघुनाथ भोजने,

शिक्षक

पर्यवेक्षक अविनाश रामफळे, इफको कंपनी व्यवस्थापकीय संचालक ढेपे साहेब, कृषी अधिकारी कासार सर,, उपाध्यक्ष बाबासाहेब जावळे , कस्तुरीताई राशिनकर, किरण जावळे, बंडू दहातोंडे,सर्व शाखा शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य,शिक्षणप्रेमी नागरिक,आप्तेष्ट व मित्रपरिवार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विजयाताई अंबाडे,माजी संस्था निरीक्षक रंगनाथ भापकर, सरपंच कु. सुनंदाताई दहातोंडे, प्राचार्य विजयकुमार पोकळे,डॉ.दीपक शिंदे,प्राचार्य घिगे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे, उच्च माध्यमिक विभाग समन्वयक प्रा.भाऊसाहेब तांबे, प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर, सरांची कन्या ऋतुजा हरिभाऊ जावळे- नेव्हे,नात अरोही अनिल जावळे, शालेय विद्यार्थीनी ज्ञानदा चौधरी,दिपाली शिर्के, साक्षी अंबाडे,आदेश भगत यांनी मनोगत व्यक्त केले.

शिक्षक

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुख्मिणी सोनवणे, अनंता शेळके,राजू शेंडगे, महेश लोखंडे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.प्रास्ताविक संदीप शेंडगे यांनी केले.प्रा.भाऊसाहेब तांबे व स्वाती दळवी यांनी सूत्रसंचालन केले व ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिक्षक
शिक्षक
शिक्षक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *