ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

नेवासा – सामाजिक एकता आणि सद्भावणीचा संदेश देण्यासाठी नेवासा फाटा येथे हिंदू बांधवांकडून मोठ्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध धर्मीय नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती ,सामाजिक कार्यकर्ते, आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून या काळात उपवास (रोजा) धरले जातात, आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो . समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे या उद्देशाने माधव नन्नवरे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचे आयोजन केले. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात एकोप्याचे अद्वितीय दृश्य पाहायला मिळाले.

इफ्तार पार्टी

यावेळी माळवदे यांनी आपले मत व्यक्त करताना “धर्म हा जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही. येथे सर्व धर्मीयांनी प्रेमाने आणि एकोप्याने राहावे. तसेच हा फक्त एक धार्मिक सोहळा नसून सामाजिक बंध मजबूत करण्याचा एक प्रयत्न आहे असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजात प्रेम आणि बंधुत्व कायम राहील” असे त्यांनी यावेळी सांगितले.या इफ्तार पार्टीत सुमारे 100 हून अधिक हिंदू मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते .खजूर ,फळे, फराळाचे पदार्थ आणि शीतपेय यांचा यामध्ये समावेश होता उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

“सामाजिक सलोखा ऐक्य आणि सौदार्ह यांचे दर्शन घडवणारा हा सोहळा नेवासाच्या इतिहासात एक संस्मरणीय क्षण ठरला”
– माधव नन्नवरे

इफ्तार पार्टी
इफ्तार पार्टी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

इफ्तार पार्टी
इफ्तार पार्टी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

इफ्तार पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *