ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

नेवासा – नेवासा खुर्द येथे नेवासा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीस हजार रुपये किंमतीचे १५० किलो गोमांस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल नारायण एकनाथ डमाळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, प्रभारी पोलीस अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरुन नेवासा खुर्द, नाईकवाडी मोहल्ला, आयेशा मस्जीद जवळ आयाज लालु चौधरी याच्या राहत्या घरात असलेल्या तळघरामध्ये गोवंशी जनावरांची कत्तल करुन गोमांसाची विक्री करत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली, त्यावरुन आम्ही सदर ठिकाणी जावून पहाणी केली असता सदरच्या घराच्या तळघारातून आम्हाला मांसाचा दुर्गंधीयुक्त वास आला. त्यामुळे आम्ही तळघरात जाऊन पाहणी करण्याचा प्रयत्न केला.

गोमांस

त्यावेळी दोन इसम व एक महिला तळ घरातून जीना वर चढून आमच्याजवळ आले, मला व पोसई श्री. पाटील असे आम्हा दोघांना धक्काबुक्की करून घराच्या बाहेर ढकलून दिले. आरडाओरडा करून तुम्ही माझ्या घरात येवू नका, तुम्ही कसे काय आमच्या घरात येता असे म्हणाले. त्यावेळी एका पुरुषाच्या हातात धारदार सत्तुर होता. त्याचा आवेग, आरडाओरडा व आक्रमकपणा पाहुन परिसरात भीती निर्माण झाली. आजुबाजुच्या रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद केले व मोहल्ल्यामध्ये थांबलेल्या लोकांची पळापळ झाली. त्यादरम्यान पोसइ पाटील यांनी त्यांना समजावून सांगितले की, तुम्ही गोवंशीय जनावराची कत्तल केली आहे, अशी आमच्याकडे खात्रीशीर माहीती आहे.

गोमांस

त्याबाबत आम्हाला पाहणी करून खात्री करायची असल्याचे त्यांनी सांगितल्याने तो इसम जोरजोराने ओरडून म्हणू लागला की, आमच्या तळघरामध्ये कसलेही गोमांस नाही, तुम्ही येथे येवू नका, येथुन निघून जा असे म्हणून मला व पोसई पाटील यांना पुन्हा धक्काबुक्की केली, त्यानंतर पोसई पाटील यांनी नेवासा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांना घडलेल्या प्रकार सांगितला. त्यावेळी लागलीच परिविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोली कॉन्स्टेबल सुमीत करंजकर, अरविंद वैद्य, श्रीनाथ गवळी व होमगार्ड स्टाफ घटनास्थळी आले. त्यानंतर सदर दोन ईसमांना व महिलेस परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी शांततेत समजावून सांगितले, त्यावेळी त्यांनी तळघराची पाहणी करण्याची संमती दिली. पोसई पाटील यांनी त्यास त्यांचे नाव विचारले असता त्याने अय्यास लालू चौधरी (वय ४४), मुजफ्फर अब्बास चौधरी (वय २६), तनवीर अय्यास चौधरी (वय ४०, सर्व रा. खाटीक गल्ली, नाईकवाडी मोहल्ला) असे सांगितले.

गोमांस

तलघरात पहाणी केली असता ३० हजार रुपये किंमतीचे २०० किलो गोवंश जातीचे गोमांस, ५०० रुपयाचा लोखंडी सत्तुर, १०० रुपयाचा एक चाकु, एक हजाराचे ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो, २ किलो वजनाचे लोखंडी माप, चार हजाराचा एक लोखंडी वजन काटा असा एकूण ३५ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वरील

इसमांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात शासकीय कर्तव्य बजावण्यापासुन अडथळा निर्माण केला व महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करुन गोमांस विक्री करण्याची मनाई असताना त्यांची कत्तल करुन विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आले. म्हणून भा. न्याय संहिता २०२३ चे कलम १३२, २७१, ३२५, ३ (५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५ (क) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोमांस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोमांस
गोमांस
गोमांस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोमांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *