ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कायदेविषयक जनजागृती

देवगड फाटा – शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायदेविषयक तरतुदींची वस्तुस्थितीची माहिती आणि कायदेविषयक शिक्षेच्या तरतुदींविषयी जागृती करण्यासाठी जिल्हा अहिल्यानगर नेवासा तालुका विधी सेवा समिती च्या वतीने नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येतील गुरुदास भास्करगिरी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पाचवी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना ‘कायदेविषयक जागरूकता कार्यक्रमाचे शनिवार दि ५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सह दिवाणी न्यायाधिस वरीष्ठ स्तर नेवासा श्री एस एन भोसले होते ,प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर श्रीमती एस व्ही जाधव चौथे सह दिवाणी न्यायाधिस नेवासा, नेवासा तालुका वकील संघाचे उपअध्यक्ष ऍड सुदाम ठुबे, जळके खुर्द चे सरपंच ऍड राजेंद्र पंडित, ऍड पि के औताडे ,ऍड विधाटे, ,ऍड रवींद्र पागिरे, उपस्थित होते.

कायदेविषयक जनजागृती

कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कायद्यांची माहिती आणि जागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.उपस्थित न्यायाधिश यांच्या कडून विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख करून देत असतांना पॉकसो कायदा, बालमजुरी, बालभीक मागणे, बाल तस्करी, बालविवाह प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळ, लैगिक अत्याचार, महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी अशा घटनांबाबत कायद्याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात चालणाऱ्या व कायद्याचे पालन करतांना कराव्या लागणाऱ्या गोष्टींची माहिती देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी गुरुदास भास्करगिरी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे एस जाधव ,श्री कडू पाटील, श्री भोंगे, पत्रकार इकबाल शेख, बाबासाहेब शिंदे शाळेतील शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थिनी, मोठया संख्येने उपस्थित होते.

कायदेविषयक जनजागृती
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कायदेविषयक जनजागृती
कायदेविषयक जनजागृती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कायदेविषयक जनजागृती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *