शेणवडगांव | अविनाश जाधव – बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणवडगांव येथे पहिल्यांदाच.. मा, श्री भाऊसाहेब कांबळे माजी आमदार, मा, राजू भाऊ शेटे, धर्मवीर संभाजी युवा प्रतिष्ठान, मास्तर गणेश जगदीशन, फिल्म निर्माता सेलिब्रेटी,, मा. शिवाजी राव कपाळे, साई आदर्श मल्टीस्टेट व गोरक्ष नाथ विटनोर शिक्षक बँक संचालक या मान्य वरांच्या उपस्थिती मध्ये स्नेहसंमेलन आनंदाने पार पडले.. यावेळी महाराष्ट्र ची लोक धारा थिम घेऊन गण गवळण, शेतकरी गीत, पोवाडा, लावणी आदिवासी गीत, देशभक्ती गीत या सर्वांची सांगड घालत चिमुकल्या ची पावलं थिरकली.

तसेच यावेळी गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच ग्रामसेविका,यांना भार्गवी मेकओव्हर कडून सन्मानित करण्यात आले व महिला च्या विविध उखाणा, रांगोळी, पाककृती, संगीत खुर्ची, या स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले, या कार्यक्रमसाठी गावातील सरपंच, उपसरपंच, व सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच गावातील सर्व माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.. या कार्यक्रमचे प्रास्ताविक मुख्याधपाक शिंदे सर नी केले व संपूर्ण नृत्य ची कॉरिओग्राफी विकास घोगरे व भार्गवी पुराणिक यांनी केली. कार्यक्रमचे सूत्रसंचालन विकास घोगरे यांनी केले व आभार सौ. दीपाली पुराणिक यांनी व्यक्त केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.