ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कालभैरवनाथ

नेवासा – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त त्रिदिनात्मक पारायण व नामसप्ताहाचे आयोजन बुधवार दि. ९ ते शुक्रवार ११ एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे. शुक्रवारी ११ एप्रिल रोजी मुख्य यात्रा आहे.

सोहळ्यात शिवलीलामृत ग्रंथांचे पारायण सकाळच्या सत्रात होणार आहे. बुधवार ९ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ५ दुर्योधन महाराज भोंगळ, रात्री ८ ते १० रामेश्वर महाराज राऊतयांचे कीर्तन, १० एप्रिल रोजी दुपारी ४. ते ५ ज्ञानेश्वर महाराज पेचे यांचे प्रवचन तर रात्री ८ ते १० गणपत महाराज आहेर यांचे कीर्तन होणार आहे.

कालभैरवनाथ

११ एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी ८ वाजता गंगेवरून -आणलेल्या कावडीच्या पाण्याने श्री कालभैरवनाथांना योगी दीपकनाथजी महाराज व महंत ऋषिनाथजी महाराज यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात येणार असून सकाळी ९ ते ११ यावेळेत श्री भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळयाची सांगता होईल.

शुक्रवारी रात्री ९ वाजता यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक’ व शोभेचे दारूकाम होणार आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ वाद्यवृंदांचा हजेरीचा कार्यक्रम तर दुपारी ३ ते ६ यावेळेत पुरुषांच्या कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन श्री कालभैरवनाथ पब्लिक ट्रस्ट, ग्रामस्थ, यात्रा समिती यांनी केले आहे.

कालभैरवनाथ
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कालभैरवनाथ
कालभैरवनाथ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कालभैरवनाथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *