नेवासा – नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर येथील भाऊसाहेब नगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाटोळे कुटुंबीयांकडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून पाटोळे कुटुंबीय दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतात. यावेळी त्यांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्यांचे वाटप करण्याचा निर्धार केला होता. हॉटेल सनी पॅलेसचे सर्वेसर्वा सनी पाटोळे, शिरीष पाटोळे, मुकिंदपुरचे लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे ,ॲडव्होकेट गणेश निमसे, भास्कर मामा लिहिणार तसेच पोलीस पाटील आदेश साठे यावेळी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.