नेवासा – तालुक्यातील जळके खु शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वाळू चोरी करणारा टेम्पो पकडला आहे याबाबत पोकॉ/४३५ बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,
आज दि २०/०४/२०२५ रोजी मी तसेच पोना/८३६ बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे, पोकॉ/७८२ किशोर आबासाहेब शिरसाठ, पोकॉ/२५२६ मनोज शिवाजी लातुरकर असे आम्ही पोनि श्री दिनेश आहेर सो. यांचे तोंडी आदेशाने नेवासा पोस्टे हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाईकामी खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत असताना पोना/८३६ बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सलाबतपुर ते प्रवरासंगम गावचे दिशेन जाणारे रोडने एक विनाक्रमांकाचा हिरव्या लाल रंगाच्या ढम्परमधुन वाळुची चोरुन वाहतुक करणार आहे.

आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोना / बाळासाहेब नागरगोजे यांनी लागलीच पंच १) श्री कल्यान बन्सी उन्हाळे, वय ३२ वर्षे, रा.प्रवारासंगम, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर व पंच २) श्री अषपाक बनोखा पठाण, वय ३१ वर्षे, रा.जळके बु., ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना सलाबतपुर ते प्रवारासंगम गावचे दिशने जाणारे रोडलगत असलेल्या जळके खुर्द गावाच्या शिवारात बोलावुन घेवुन त्यांना बातमीतील नमुद हकीगत सांगुन सदर ठिकाणी छापा टाकणे कामी पंच म्हणुन हजर राहण्याची विनंती केल्याने ते पंच म्हणुन सोबत येण्यास त्यांनी सहमती दर्शविली सोबत लॅपटॉप व पोर्टेबल प्रिंटर सोबत घेतल्याचे कळविले.

आम्ही वरील नमुद पोलीस स्टाफ व दोन पंच असे सलाबतपुर ते प्रवारासंगम गावात जाणारे रोडलगत असलेल्या जळके खुर्द गावच्या शिवारात थांबलो असता ठिक पहाटे ०४/१० वा चे सुमारास आम्हास सलाबतपुर कडुन प्रवारासंगम गावाच्या दिशेन जाताना एक हिरवा लाल रंगाचा टाटा कंपनीचा ढम्पर येताना आम्हास दिसले आमची व पंचाची बातमीतील हकीकतीप्रमाणे खात्री होताच आम्ही सदर वाहनास हात करुन व बॅटरीचे सहाय्याने इशारा करुन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहनावरील चालकाने त्याचे वाहन रोडचे कडेला थांबविले तेव्हा त्यास आम्ही आमची व पंचाची ओळख समजावुन सांगुन सदर ढम्परची पाहणी केली असता सदर ढम्परच्या नबंर एम.एच.१२, सी.टी.०५४० असा असुन मागील हौदामध्ये वाळु मिळुन आली

सदर ढम्परवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) अशोक लक्ष्मण कदम, वय ३६ वर्षे, धंदा शेती, रा.खळवडी, नेवासा खुर्द, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमास ढम्पर कोणाच्या मालकीचा आहे तसेच वाळु वाहतुकीचा परवाना आहे काय याबाबत विचारपुस केली असता त्याने सदर ढम्पर हे २) सागर खंडागळे (पुर्ण माहित नाही), रा. सुरेशनगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याचे असल्याचे सांगुन वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. सदर वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्याचे वर्णन खालीलप्रमाणे-
१) १०,००,०००/- रु. किंचा एम.एच.१२, सी.टी.०५४० क्रमांकाचा हिरव्या लाल रंगाचा टाटा कंपनीचा १६१२ मॉडेलचा ढम्पर असलेला जु.वा.किं.अं.
२) ३०,०००/- रु.किंची ०३ ब्रास वाळु अंदाजे
१०,३०,०००/- रु. एकुण

येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पोना/ ८३६ बाळासाहेब नागरगोजे यांनी पंचांसमक्ष जागीच जप्त केला आहे.
तरी आज दिनांक २०/०४/२०२५ रोजी पहाटे ०४/१० वा.चे सुमारास सलाबतपुर कडुन प्रवारासंगम गावाचे दिशने चालक नामे १) अशोक लक्ष्मण कदम, वय ३६ वर्षे, धंदा शेती, रा. खळवडी, नेवासा खुर्द, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, व मालक २) सागर खंडागळे (पुर्ण माहित नाही) (फरार), रा. सुरेशनगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हे चोरटी वाळुची वाहतुक करताना मिळुन आले म्हणुन माझी त्यांचेविरुद्ध बीएनएस कलम ३०३ (२), ३ (५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.