नेवासा – कुकाना तालुका नेवासा येथील आर्ले पाटील अर्बन को -ऑप.क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ. मिना गणेश आर्ले यांची तर व्हा. चेअरमन पदी कृष्णा बाळासाहेब कोलते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अधिकारी श्री. एन. के. वनवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.

संस्थापक डॉ. गणेश आर्ले यांनी नूतन पदाधिकारी चेअरमन सौ. मीना गणेश आर्ले, व्हा.चेअरमन कृष्णा बाळासाहेब कोलते, डॉ. यशवंत गवळी,डॉ. अरुण वाबळे, श्री. बाळासाहेब कोलते, श्री.बाबासाहेब नजन, श्री. कारभारी आर्ले, श्रीमती रंजना कांडेकर, सौ. सुनिता मिसाळ यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी संस्थेचे मॅनेजर श्री. नितीन मेहेत्रे, सौ.रूपा देठे यांचे सहकार्य यावेळी लाभले.
अल्पावधीतच तालुक्यात विश्वासास पात्र कारभारामुळे नावारूपास आलेली पतसंस्था म्हणून संस्थेची ओळख निर्माण झाली आहे तसेच संस्थापक डॉ. गणेश आर्ले यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांना विनाकारणी कर्जवितरण देणारी एकमेव संस्था


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.