देवगड फाटा – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र प्रवरा संगम व टोका येथे मंगळवारी (ता. २२) पासून ते मंगळवार (ता. २९)एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे विविध धार्मिक कार्यक्रमांनी ‘ आयोजन करण्यात आले, अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भगवंतांच्या कृपेने वै श्री समर्थ किसनगिरी बाबा ,वै देविदास महाराज सुरडकर, वै प. पु, बालब्रम्हचारी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांचा प्रेरणेने तसेच ह भ प राजेंद्र महाराज आसने यांच्या नेतृत्वाखाली सप्पन होत आहे.

होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात होणाऱ्या विविध धार्मिकमय कार्यक्रमांचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण कार्यक्रमांचा सर्व स्तरातील भाविकांनी लाभ घ्यावा, मंगळवार (ता. २२) रोजी सकाळी आठ वाजता ह भ प देविदास महाराज म्हस्के (ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री क्षेत्र नेवासा) व चांगदेव महाराज काळे(गेवराई) ह भ प राजेंद्र महाराज आसने,व इतर साधू संतांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ पुजन,द्विप प्रज्वलन,कलश-वीणा व ध्वज पूजनाने करण्यात येणार आहे.

दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहात दररोज काकडा भजन,पारायण,हरिपाठ,नित्याची आरती होणार आहे. यावेळी दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत
1) हभप भागवताचार्य महेश जी महाराज मडके (डोगरगण),
2)रामनाचार्य अशोक महाराज निरफळ (गणेशवाडी)
3)दादा महाराज वायसळ(रामकृष्ण भक्तिधाम आश्रम लखमपूर),
4)भागवताचार्य अतुल महाराज अदमाणे(श्री क्षेत्र शनि शिंगणापूर)
5)संगीत विशारद ह भ प सौ वनिता ताई प्रकाश पाटील(भिवंडी, मुबंई)
6)गंगाधर महाराज राऊत (बोकुड जळगाव)
यांची कीर्तन सेवा होणार आहे

तसेच मंगळवार दि २९ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह भ प महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान )यांचे काल्याचे कीर्तन सप्पन होणार आहे
सप्ताह काळात सकाळ, दुपार, संध्याकाळ रोज गावातील अन्नदात्याकडून अन्नदान होणार आहे
सप्ताह काळात रोज दुपारी ३.३० ते ४.३० श्री जगतगुरु तुकाराम महाराज जीवन चरित्र संगीत कथा सप्पन होणार आहे कथा प्रवक्ते म्हणून ह भ प नारायण महाराज ससे (जळके बुद्रुक) असणार आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.