ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मळगंगा देवी

नेवासा – मळगंगादेवीच्या यात्रेनिमित्त निघोज वरून आलेल्या श्री मळगंगा देवीच्या पालखीची नेवासा शहरातून मिरवणूक काढण्यात आली.या पालखी मिरवणुकीचे फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.
      नेवासा येथील एस टी स्टँड जवळ असलेल्या  मळगंगा देवीच्या मंदिरापासून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.यावेळी निघोज येथून आणलेल्या श्री मळगंगादेवीच्या घागरीची व पालखीची सुवासींनीनी पंचारती ओवाळून स्वागत केले.

मळगंगा देवी

अग्रभागी झेंडा काठी,
त्यामागे सनई चौघडा ,पुष्पांनी सजविण्यात आलेली मळगंगा देवीची पालखी व पालखी मागे देवीच्या नावाने जयघोष करणारे भाविक असे या पालखी  मिरवणुकीचे स्वरूप होते.
  एस टी स्टँड,नगरपंचायत चौक,शहरातील मुख्य पेठेतून पालखी काढण्यात आली.या पालखीचे नेवासेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करून दर्शन घेतले.

मळगंगा देवी

या पालखी मिरवणुकीच्या प्रसंगी  रेणुकादास घोलप,सौ.सुमन घोलप, परशुराम घोलप,सौ.लता घोलप,राम घोलप,सौ.ज्योती घोलप,सचिन घोलप,सौ.जयश्री घोलप,सागर घोलप, वैशाली घोलप,संदीप घोलप,वैशाली घोलप,स्वप्नील घोलप,ओमकार घोलप,सोहम घोलप,रुद्र घोलप यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

मळगंगा देवी


   या मिरवणुकीत निघोज पालखी नेतृत्व करणारे भाऊ घोलप,अशोक गावडे,बाळासाहेब म्हसे,ज्ञानेश्वर झेंडे,राजू यादव,दादा कदम,विष्णू म्हसे, योगेश कदम,सागर घोलप,जालिंदर कुटे,मच्छिंद्र चौरे,राजू शिंदे,राहुल गावडे, प्रशांत सोनवणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
      मळगंगादेवीच्या पालखी मिरवणुकीचा समारोप  मळगंगादेवी मंदिर प्रांगणात समारोप झाल्यानंतर देवीच्या पालखीचे असंख्य भाविकांनी दर्शन घेतले संबळाच्या निनादात देवीची महाआरती करण्यात आली .
   यावेळी उपस्थित भाविकांना आंबील महाप्रसाद वाटण्यात आला.रात्री झालेल्या देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रमाला भाविक उपस्थित होते .

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मळगंगा देवी
मळगंगा देवी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मळगंगा देवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *