ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शेत

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – नेवासा तालुक्यातील शेत रस्ता व शिव रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता मिळून देण्यासाठी व रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद चळवळ ही श्री शरद राव पवळे चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष आणि श्री दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक व महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे यांनी सुरू केली. नेवासा तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व तिसऱ्या गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये जनन्याय दिन आयोजित केला जात असतो . परंतु एक मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे नुकताच दिनांक शुक्रवार 2 मे 2025 रोजी जनन्याय दिन संपन्न झाला यावेळी नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, अव्वल कारकून श्री कुलकर्णी यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष रस्ता प्रकरणे हाताळली.

शेत

143 व 5/2 खालील रस्ता प्रकरणे नेवासा तालुक्यात पेंडिंग राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे यावेळी डॉक्टर संजय बिरादार यांनी सांगितले त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये प्रकरणे लवकर मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली
कार्यालयातील लिपिक श्री झिने यांनी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळ समिती जनन्याय दिन चा फलक तहसील कार्यालय मध्ये लावला. यावेळी गेल्या मार्च महिन्यात नेवासा तालुक्यातील , शिव रस्ता हद्दी खुणा निश्चित करून दिल्या, पोलीस ठाणे नेवासा यांच्याकडून शिवरस्ताहद्दी खुणा व रस्ता खुला करण्यासाठी विनाशुल्क मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध केला.
*परंतु काही ठिकाणी रस्ते खुले करण्याचे काम अपूर्ण असल्याबद्दल चर्चा करून व स्थळ निरीक्षण करून मंडळ अधिकारी प्रश्न सोडवतील असे तहसीलदारांनी सांगितले

शेत

तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी आपापली प्रकरणे व्यवस्थित रचना करून माझ्याकडे द्यावीत म्हणजे त्यावर मला कायद्यानुसार सविस्तर कायदेशीर कारवाई करण्यास व संबंधितांना सूचना देण्यास सहज शक्य होईल येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते खुले होतील असे आश्वासने त्यावेळी दिले. सर्व समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी डाक बंगला शासकीय विश्रामगृह नेवासा येथे मीटिंग आयोजित करून तहसील कार्यालयात जनन्याय दिना साठी प्रवेश केला तसेच त्यावेळी चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरदराव पवळे यांचा ही मोबाईल वरून प्रत्यक्षात संदेश व मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी दैनिक आशाचे पत्रकार श्री सुमित पटारे हेही उपस्थित होते. या जनन्यायदिनातून उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री संदीप गोसावी साहेब यांनी प्रत्येक महिन्याला तीन शिवरस्ते विनाशुल्क व मोफत खुले करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेतला.

शेत

या जन न्याय दिनाचे वेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील, , रमेश भक्त, संभाजी पवार, ज्ञानदेव आरगडे, चांगदेव आरगडे, सगाजी ऐनर,श्री सागर सोनटक्के, भगवान पटेकर, बाळासाहेब थोरात, l,
अजित प्रकाश गोळेचा, धर्म एकनाथ तूवर,प्रभाकर तुवर मतीन खान ऑफिस खान पठाण, प्रशांत चौधरी, विठ्ठल करमड. बाबासाहेब शिरसाठ,हरिभाऊ तुवर, श्रीपत दारुंटे , , प्रवीण पवार, श्री जानकु रुपनर,साहेबराव आखाडे, श्री संतोष भाऊसाहेब शिंदे, बबन शिंदे, मुरलीधर जरे, , अरविंद झिने, श्री राजेंद्र पोतदार तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते पुढील जन्यादिन 15 मे 2025 रोजी होईल असे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी जाहीर केले जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या जनन्याय दिनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले.

शेत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेत
शेत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *