ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
यशवंतराव


सर्वसामान्य शेतमजूरांपासून ते संत महंताची उपस्थिती.

सोनई – जेष्ठ साहित्यिक ,माजी खा यशवंतराव गडाख यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त सोनई ता नेवासा येथे सोम दि 12 मे 2025 रोजी अभिष्टचिंतन करण्यासाठी नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातून विविध पक्षाचे ,संस्थांचे पदाधिकारी, साहित्यिक,कार्यकर्ते,शेतकरी,संत महंत, विधिज्ञ,पत्रकार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सकाळी 9 ते दु 1.30 वाजेपर्यंत अभिष्टचिंतनासाठी मोठी गर्दी झाली होती. उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार मा खा यशवंतराव गडाख यांनी केला. याप्रसंगी बोलतांना माजी खा यशवंतराव गडाख म्हणाले सामाजिक जीवनात सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून काम केले,रचनात्मक कामाचा ध्यास घेऊन जनतेसाठी विधायक काम करता आले याचा मनाला अभिमान आहे.

यशवंतराव

माझ्यावरील प्रेमापोटी 82 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य शेतमजूरा पासून ,संत महंत,पदाधिकारी उपस्थित राहिले याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित कार्यकर्ते ,पदाधिकारी यांचेशी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी संवाद साधला. याप्रसंगी ह भ प देविदास महाराज म्हस्के,माजी आ पांडुरंग अभंग,महंत रमेशानंदगिरी महाराज,महंत अवेराज महाराज,ह भ प रामनाथ महाराज पवार,लक्ष्मणनारायण महाराज जोंधळे,ज्ञानेश्वर महाराज हजारे, गणेश महाराज शेजुळ,नामदेव महाराज कोरडे ,अतुल महाराज आदमने,ब्रम्हकुमारी उषा दीदी गडाख कुटूंबातील सदस्य आदींसह माजी खा यशवंतराव गडाख यांच्या सोबत गेल्या 50 वर्षांपासून काम करत असलेले अनेक जुने जाणते जेष्ठ कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी मा खा यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त भेट आलेले पुस्तके नेवासा तालुक्यातील विविध यशवंत वाचनालयांना भेट देण्यात येणार आहे.

यशवंतराव
यशवंतराव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यशवंतराव
यशवंतराव
यशवंतराव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यशवंतराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *