ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
एसटी

नेवासा – एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक आणि वाहकपदासह अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली. एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील कर्मचारी भरतीला २०२४ पर्यंत मनाई केली होती.

एसटी

तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक, वाहक या पदासह अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस. टी. महामंडळाच्या ३०७ व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठीं -पाठवण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. सध्या एसटी. महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

एसटी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एसटी
एसटी
एसटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एसटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *