नेवासा – इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल आज (मंगळवार दि. १३ मे) दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी १ वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
दरवर्षीपेक्षा सुमारे १० दिवस आधी परीक्षेचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. येत्या १५ मे पूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळाने दिली

विद्यार्थ्यांसाठी खालील संकेत स्थळांवर निकाल उपलब्ध असतीलः
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.