ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
दहावी

कु आर्या जायभाये 97.20 गुण मिळवून विद्यालयासह मुळा एज्युकेशन सोसायटीत प्रथम

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईचा एस एस सी परीक्षेचा निकाल शेकडा 88.66 टक्के लागला असून कु आर्या लक्ष्मण जायभाये 97.20 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे तर ओंकार राजेंद्र घुमे 93.20 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर कु सुप्रिया सुरेश डोळे 92.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. कु आर्या जायभाये हिने विद्यालयासह मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विद्यालयातही प्रथम क्रमांक मिळवला आहे. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान विद्यालयाच्या वतीने प्राचार्या इंदुमती खंडागळे,उपप्राचार्य एकनाथ गवळी,सुनंदा दरंदले घाडगे,किशोर मुंगसे,जालिंदर शेटे,अर्जुन दराडे,संजय पुंड, प्रदीप डांगे,चौधरी यांनी केले.

दहावी

याप्रसंगी बोलतांना प्राचार्या इंदुमती खंडागळे म्हणाल्या कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते गुणवत्तापूर्ण पध्दतीने विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश अभिमास्पद असेच आहे. यापुढेही सदैव विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध राहीलयशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख,सचिव उत्तमराव लोंढे,सहसचिव डॉ विनायक देशमुख, शासनधिकारी डॉ अशोक तुवर आदींनी अभिनंदन केले आहे.

दहावी
दहावी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दहावी
दहावी
दहावी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दहावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *